एकट्या वागळे पट्ट्यातून वर्षभरात पाणीपट्टीमधून महापालिकेला मिळणारे सुमारे दहा कोटींचे उत्पन्न स्मार्ट मीटरमुळे ८५ लाखांवर आले आहे.

एकट्या वागळे पट्ट्यातून वर्षभरात पाणीपट्टीमधून महापालिकेला मिळणारे सुमारे दहा कोटींचे उत्पन्न स्मार्ट मीटरमुळे ८५ लाखांवर आले आहे.ठाणे: एकट्या वागळे पट्ट्यातून वर्षभरात पाणीपट्टीमधून महापालिकेला मिळणारे सुमारे दहा कोटींचे उत्पन्न स्मार्ट मीटरमुळे ८५ लाखांवर आले आहे. दुसरीकडे मोठमोठया गृहासंकुलांना प्रमाणात बिले येत आहेत. हे मीटरच झोपडपट्टीमधून काढून टाका अशी मागणी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.
झोपडपट्टी भागात लावण्यात आले असून काहींना अधिकची बिले गेली आहेत, तर काहींना आधीपेक्षाही कमी बिले गेली आहेत. परिणामी ठाणे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. वागळे इस्टेट परिसरातून महापालिकेला यापूर्वी वर्षाकाठी नऊ कोटी ८५ लाखांचे बिल वसुल होत होते. परंतु आता महापालिकेला येथून अवघे ८५ लाखांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती योगेश जानकर यांनी महासभेत सांगितले. अभय योजनेचा लाभ देखील पाणी बिलांची थकबाकी भरणाऱ्यांना मिळावा अशी मागणी देखील त्यांनी केली. विशेष म्हणजे या पट्ट्यात १३० मीटर चोरीला गेले असून पुन्हा नव्याने बसविण्यासाठी नागरीकांकडून प्रत्येकी आठ हजार रुपये मागितले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे यावर योग्य तो तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली. झोपडपट्टी भागात लावण्यात आलेले मीटर काढून टाकण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. येथील नागरीकांना जुन्याच दराने बिले देण्यात यावीत अशी मागणीही करण्यात आली.दुसरीकडे गृहसुंकलातील नागरीकांना कमी बिले येत असल्याचा मुद्दा यावेळी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी उपस्थित केला.
यापूर्वी देखील झोपडपट्टी भागातील नागरीकांचा पाण्याचा वापर अधिक प्रमाणात होत होता. आता देखील वापर अधिक असल्याने नागरीकांना अधिकची बिले येत असल्याचा दावा नगरअभियंता अर्जुन अहिरे यांनी केला. त्याला माजी महौपार मिनाक्षी शिंदे यांनी दुजोरा देत ज्या पध्दतीने पाणी वापरले जात असेल त्या पध्दतीने बिले येणारच आणि पाण्याचा वापर कमी व्हावा, बचत व्हावी याच हेतूने मीटर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळायचा असेल तर मीटर योग्यच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सभागृहाचा एकूणच रोख पाहता महापौर नरेश म्हस्के यांनी देखील पुढील वर्षभरापर्यंत स्मार्ट मीटर संपूर्णपणे बसविले जात नाहीत तोपर्यंत जुन्या दराने पाणी बिलांची वसुली करावी की नाही याबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे सभागृहात सांगितले. त्यानंतरच यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.

Share this post