गडकरी रंगायतन येथे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅप्सूल लिफ्ट उभारणीसाठी ५० लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

गडकरी रंगायतन येथे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅप्सूल लिफ्ट उभारणीसाठी ५० लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

ठाणे शहराचा मानबिंदू असलेल्या ४३ वर्षे जुन्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी नाट्यगृहाच्या पहिल्या मजल्यावर व बाल्कनीमध्ये वर येण्यासाठी कॅप्सूल लिफ्ट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रंगायतनला जिन्याच्या व्यतिरिक्त कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेत खासदार राजन विचारे यांनी खासदार निधी उपलब्ध नसल्याने महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लिफ्ट उभारण्यासाठी निधीची मागणी केली होती. श्री.शिंदे यांनी कोणताही विलंब न लावता निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णयान्वये महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत गडकरी रंगायतन येथे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅप्सूल लिफ्ट उभारणीसाठी ५० लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

या लिफ्टमुळे नाट्यरसिक ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना नाटकांचा आस्वाद घेता येणार आहे.

Share this post