तीन वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाली होती. यानंतर तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला होता.

तीन वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाली होती. यानंतर तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला होता.

ठाण्यातील कासारवडवली येथे तीन वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणातील नराधमाची फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली.रामकिरत मुनीलाल गौड असे दोषीचे नाव असून ठाणे न्यायालयाने त्याला २०१९ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती.

कासारवडवली भागातील जेबी रोड येथे २०१३ मध्ये तीन वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना घडली होती. तीन वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाली होती. यानंतर तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला होता. शवविच्छेदनात चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या केल्याचे उघड झाले.

पोलिस तपासात रामकिरत गौडने मुलीची हत्या केल्याचे उघड झाले. मुलीचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला होता त्या ठिकाणी चिखल होता. तर रामकिरतच्या चपलेवरही चिखल होते. फॉरेन्सिक तपासणीत हा महत्त्वाचा पुरावा होता. या प्रकरणात १३ साक्षीदारांनी न्यायालयासमोर साक्ष नोंदवली होती.ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने मार्च २०१९ मध्ये रामकिरत गौडला फाशीची शिक्षा सुनावली होती. याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. गुरुवारी न्यायाधीश साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी याचिकेवर निकाल दिला. न्यायालयाने रामकिरत गौडची फाशीची शिक्षा कायम ठेवली.

Share this post