12 ते 22 नोव्हेंबरदरम्यान केलेल्या कारवाईत 42 हजार 616 केसेस दाखल करून 36 70 हजार 650 रुपये दंड आकारण्यात आला आहे

12 ते 22 नोव्हेंबरदरम्यान केलेल्या कारवाईत 42 हजार 616 केसेस दाखल करून 36 70 हजार 650 रुपये दंड आकारण्यात आला आहे

ठाणे: कोरोना निर्बंधांत ढिलाई आल्यानंतर ठाण्यात वाहतूककोेंडी आणि वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामध्ये वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणार्‍या बेशिस्त बाईकस्वार तसेच चारचाकी चालकांचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास ठाणे शहर वाहतूक विभागाने सुरुवात केली आहे. ठाणे शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाने अवघ्या 10 दिवसांत तब्बल 42 हजार 616 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत 36 लाख 70 हजार 650 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक 7 हजार 566 विनाहेल्मेट गाडी चालविणार्‍या दुचाकीस्वारांचा समावेश आहे.

ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक विभागाच्या तब्बल 18 उपशाखा आहेत. ठाणे शहर वाहतूक विभागामार्फत गेल्या आठवड्यापासून मोटार वाहन कायद्याच्या विविध तरतुदींप्रमाणे कारवाईसाठी काही विशेष मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत. 12 ते 22 नोव्हेंबरदरम्यान केलेल्या कारवाईत 42 हजार 616 केसेस दाखल करून 36 70 हजार 650 रुपये दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये टॅक्सीचालकांनी गणवेष परिधान न केलेल्या 3 हजार 757 आढळून आले. तर फ्रंट सीटच्या 4 हजार 781, विना लायन्सच्या 793, विनाहेल्मेट 7 हजार 566, मद्यपी 25 जणांवर, ट्रिपल सीट 541, विनासीटबेल्ट 1 हजार 496, सिग्नल तोडण्याचा 1 हजार 346, धोकादायक वाहन चालविणे 482, मोबाइलवर बोलणे 474 अशा एकूण विविध सेक्शन अंतर्गत 42 हजार 616 दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे

Share this post