जांभळी नाका येथे चैत्र नवरात्रोत्सवात आदेश बांदेकर यांचा मराठमोळा भोंडला रंगला.

जांभळी नाका येथे चैत्र नवरात्रोत्सवात आदेश बांदेकर यांचा मराठमोळा भोंडला रंगला.


प्रतिनिधी -आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील शिवाजी मैदान चैत्रनवरात्रोत्सव २०२२ भक्ती व कला महोत्सवाच्या पाचव्या दिवशी भोंडला आणि मराठमोळा दांडिया सादरकर्ते माय मराठी वाद्यवृंद मुंबई हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये श्री. आदेश बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या भोंडला मध्ये आदेश भाऊजींचा पैठणीचा खेळ रंगला त्यामध्ये अनेक महिलांनी नृत्य करून उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली. दरवर्षी प्रमाणे गावदेवी भाजी मंडई मंडळाची वारकरी दिंडी या उत्सवात येते. त्यावेळी अनेक वारकरी त्यामध्ये सहभागी होतात.
तसेच देवीच्या दर्शनासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व त्यांच्या पत्नी, वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त बाळासाहेब पाटील व त्यांच्या पत्नी सौ. शुभांगी पाटील यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. कार्यक्रमासाठी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, नगरसेविका नंदिनी विचारे, निर्मला कणसे, प्रभा बोरीटकर, महिला आघाडी वंदना डोंगरे, नवीमुंबई चे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, विरोधीपक्ष नेते विजय चौगुले, माजी स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, नगरसेविका शीतल कचरे, नगरसेवक जगदीश गवते, रवींद्र पाटील, महारष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष गजानन चव्हाण, युवासेना सहसचिव धनश्री राजन विचारे व युवतीसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट
मासुंदा तलावाच्या तरंगत्या रंगमंचावर पहाटे रंगणार शास्त्रीय संगीताची मैफिल

उद्या शुक्रवार दि. ०८ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ६:०० वा. (स्वरांजली) मंजुषा पाटील आणि संजीव अभ्यंकर

शनिवार दि. ०९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ६:०० वा. (लयमंजीरी) सावनी शेंडे आणि जयतीर्थ मेउंडी

रविवार दि. १० एप्रिल २०२२ सकाळी ६:०० वा. (स्वरानुभूती) आरती अंकलीकर टिकेकर आणि शौनक अभिषेकी

Share this post