भाजप नेत्यांच्या ठाणे, भाईंदरमधील बेकयादा कारनाम्यांची चौकशी करा – आमदार प्रताप सरनाईक

भाजप नेत्यांच्या ठाणे, भाईंदरमधील बेकयादा कारनाम्यांची चौकशी करा – आमदार प्रताप सरनाईक

भाजप नेत्यांच्या ठाणे, भाईंदरमधील बेकयादा कारनाम्यांची चौकशी करा अशी मागणी करणारे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिलं आहे.आ. प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या इमारतीचा कोट्यवधीचा कर राज्य सरकारने माफ केला आहे. याविरोधात आणि भायखळामधील राणी बागेत परदेशातून प्राणी आणण्याच्या निविदांमध्ये १०६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. यावर आता आमदार प्रताप सरनाईक यांनी सुद्धा राज्यपालांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

छाबय्या इमारतीचा राज्य सरकारने दंड माफ केल्यामुळे भाजप नेत्यांनी पत्र लिहून लक्ष घालण्याची मागणी केली आहे. पंरतु त्याच भाजप नेत्यांचे ठाणे आणि मीरा भाइंदरमध्ये बेकायदा कारनामे केले आहेत. याची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रातून भाजप नेत्यांचा बुरखा फाडला आहे. भाजपचे काही नेते माझ्याविरोधातील कारवाईची मागणी करत आहेत. परंतु जर त्यांच्या तक्रारीची दखल घेणार असाल तर कोणताही मुलाहिजा न ठेवता माझ्या पत्राचीही गंभीर दखल घेण्यात यावी असे सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

Share this post