भिवंडी मातोश्री वृद्धाश्रमातील कोरोना पॉसिटीव्ह 69 रुग्णांवर ठाणे सिव्हिल रुग्णालय येथे उपचार सुरू…

भिवंडी मातोश्री वृद्धाश्रमातील कोरोना पॉसिटीव्ह 69 रुग्णांवर ठाणे सिव्हिल रुग्णालय येथे उपचार सुरू…

Anchor : भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमातील तब्बल 69 जणांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून या सर्व वृद्धांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . खडवली येथील नदीकिनारी मातोश्री वृद्धाश्रम असून त्या ठिकाणी सुमारे शंभर हुन अधिक व्याधीग्रस्त वयोवृद्ध वास्तव्यास आहेत. या सर्व रुग्णांना काल रात्रीच ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे ..यात 4 रुग्ण ऑक्सिजन वर असताना बाकीच्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे यात 38 पुरुष असून 28 महिला आहेत तर 2लहान मुले व एक गर्भवती महिलेचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका येथून आलेल्या ओमिक्रोन या नवीन व्हेरिएन्ट च्या अनुषंगाने या रुग्णांचे स्वॅब तपासणी साठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. आणि नवीन व्हेरिएन्ट ची क्षमता व प्रभाव किती आहे हे आताच सांगता येणार नाही..मात्र याबद्दल काळजी घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक कैलास पवार यांनी केले आहे ..त्याच बरोबर सिव्हिल रुग्णालयातील बेड्स, व्हेंटिलेटर,icu, ऑक्सिजन,डॉक्टर आणि स्टाफ सर्व काही सज्ज असल्याचे देखील डॉ पवार यांनी सांगितले आहे..

Share this post