मासुंदा तलावाच्या तरंगत्या रंगमंचावर पहाटे रंगली भक्ती संगीताची मैफिल

मासुंदा तलावाच्या तरंगत्या रंगमंचावर पहाटे रंगली भक्ती संगीताची मैफिल

प्रतिनिधी – आज शुक्रवार दि. ०८ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ६:०० वा. स्वरांजली या कार्यक्रमाअंतर्गत सुप्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील आणि पंडित संजीव अभ्यंकर यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम मासुंदा तलावातील एम्फी थेटर मधल्या तरंगत्या रंगमंचावर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पहाटे पासून नागरिकांनी उपस्थिती नोंदवली होती. या बहारदार कार्यक्रमाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. खासदार राजन विचारे, परिवहन सभापती विलास जोशी, नगरसेविका नंदिनी विचारे, युवती सेना सह सचिव धनश्री विचारे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Share this post