मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ठाणे आणि कल्याण या दोन्ही उपकेंद्रांना हेच नाव कायम ठेवण्याबाबत देखील या बैठकीत एकमत झाले आहे.मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू श्री. रवींद्र कुलकर्णी यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निर्णयाचे हे पत्र त्यांना सुपूर्द केले.

धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे शहरातील सर्वांगीण योगदान लक्षात घेऊन ठाणे शहरात बालकुम परिसरात तयार करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला त्यांचे नाव देण्यात यावे अशी शिफारस राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यापीठाला केली होती. तशी मागणी करणारे पत्रच त्यांनी विद्यापीठाला लिहिलं होतं.

याबाबत मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या झालेल्या बैठकीत धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील योगदान पहाता त्यांचेच नाव या उपकेंद्राला देणे योग्य ठरेल याबाबत समितीच्या सदस्यांचे एकमत झाले. याशिवाय मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राला देखील हेच नाव कायम ठेवण्याचे देखील या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.

Share this post