मुंब्रा परिसरात नशा करणाऱ्या आणि नशेच्या वस्तू विकणाऱ्या 8 जणांची पोलिसांनी रस्त्यावरून धिंड काढली आहे.

मुंब्रा परिसरात नशा करणाऱ्या आणि नशेच्या वस्तू विकणाऱ्या 8 जणांची पोलिसांनी रस्त्यावरून धिंड काढली आहे.

Anchor : मुंब्रा परिसरात नशा करणाऱ्या आणि नशेच्या वस्तू विकणाऱ्या 8 जणांची पोलिसांनी रस्त्यावरून धिंड काढली आहे. मुंब्रा येथील रशीद कंपाऊंड येथे गांजा आणि कोरेक्स सारखी नशा करणे आणि विक्रीचे प्रकार होत असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे psi हर्षद काळे यांना मिळाली. हर्षद काळे यांनी आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पोहचून 8 जणांना ताब्यात घेतले. आणि हाताला दोरखंड बांधून त्यांची मुंब्रा शहरात धिंड काढली.. या वेळी पोलिसांनी रस्तावर चालता चालता या नशा करणाऱ्यांना ‘पुन्हा नशा करणार नाही’ अशा घोषणा देण्यास सांगितल्या.. या आधी देखील मुंब्रा पोलिस ठाण्याचे PSI हर्षद काळे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर ड्रॅग आणि आमली पदार्थ विक्री आणि खरेदी करण्या विरोधी कारवाई करत अनेक कारवाई करत अनेकांना अटक केली आहे.

Share this post