शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यामधील वादा आता रस्त्यावर आला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यामधील वादा आता रस्त्यावर आला आहे.

ANCHOR – शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यामधील वादा आता रस्त्यावर आला आहे. INS विक्रांत युद्धनौकेच्या संवर्धनासाठी किरीट सोमय्या यांनी जनतेकडून कोट्यवधी रुपये गोळा केले होते, परंतु ते राजभवनात न भरल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढला.

VO – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकास आघाडी विरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली असून त्यांच्यामुळे अनेक बडे नेते अडचणीत आले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या विरोधात तर त्यांनी गंभीर आरोप करत शिवसेनेलाच अडचणीत आणले आहे. त्यावर कुरघोडी करण्यासाठी संजय राऊत यांनी INS विक्रांत युद्धनौकेच्या संवर्धनासाठी किरीट सोमय्या यांनी जनतेकडून कोट्यावधी रुपये गोळा करून परस्पर त्याचा अपहार केल्याचा आरोप केला. भारतीय नौदलाची शान असलेल्या INS विक्रांत युद्धनौकेच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा करून तो परस्पर लाटल्याचा गंभीर आरोप करत आज शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी मोठ्या मोर्चाचे आयोजन केले होते. जोपर्यंत सोमय्या यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही असा इशारा सेनेच्या वतीने खासदार राजन विचारे ,आमदार रवींद्र फाटक,माजी महापौर नरेश म्हस्के यांनी दिला. किरीट सोमय्या यांच्या पोस्टरला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली. सोमय्या यांच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे यासाठी ठाणे जिल्ह्याधिकारी यांना निवेदन राजन विचारे देणार होते परंतु न्यायालय परिसर असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शिवसेनेने पोलिसांच्या विनंती ला मान देत आंदोलन थांबवले. 

BYTE – राजन विचारे (खासदार, शिवसेना)

Share this post